Tuesday 31 July 2018

पहिलं घर


पहिलं घर हे नेहमीच special असतं. Lodha belmondo हे पुण्या मधलं आमचं पहिलं घर. Weekend home concept चं हे ठिकाण पवना नदीच्या किनारी शांत जागेत आहे. Golf course, Swimming pools, Movie theater, Cricket ground, Spa, Kids club आणि बरचं काही. सह्याद्रीच्या डोंगरांच्या कुशीतील हे १०० एकरचं विश्व खरंच खूप सुंदर रित्या बनवलय.
ह्या जागेच special असण्याचं आणि एक कारण की आम्ही दोघे इथंच कॉलेज मधेच भेटलोय, आणि ह्या ठिकाणीच आमचं प्रेम जमल. ज्या ठिकाणी आपण आयुष्याची सगळी स्वप्नं बघितली त्या ठिकाणी हक्कचं घर मिळालं.
पुण्यातून बाहेर जाताना वाटायचं कि खूप काही सोडून चाललोय... पण आता वाटत कि खूप काही मिळालय, आता वाटतंय की आपल घर वाट बघतय. मी माझ्या घराला पहिलं गिफ्ट म्हणून तुळशीबागेतून एक wheel chain आणली. आता वाऱ्याची झुळूक आली की घर खळखळून हसत.
मी आता दुबईत परत आलेय पण माझं मन अजून त्या घरातल्या बाल्कनी मध्ये बसून पावसाच्या थेंबांना झेलतयं.

आता भारतात यायच्या फेऱ्या वाढणार हे नक्की.

https://www.youtube.com/watch?v=2-xtEcLqc5A